पिंपरी चिंचवड : गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्र आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत यंत्रणेचे दुरुस्ती कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी (दि. १८) सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रावेत येथील जलउपसा केंद्र बंद राहणार आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा गुरुवारी (१८) सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवारी (दि. १९) होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.