पैशाच्या वादातून मावस भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी – पैसे न दिल्याच्या कारणावरुन मावस भावावर कोयत्याने वार जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना जुनी सांगवी येथे शनिवारी (दि.30) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात राजेश टारझन कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांची पत्नी वर्षा राजेश कुलकर्णी (वय 30, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार राजू रघु बंगेरा (वय 26, रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्षा यांचे पती राजेश आणि आरोपी राजू हे मावस भाऊ आहेत. आरोपी राजू याने राजेश यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. मात्र, राजेश यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या राजूने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Leave a Comment