‘ड्रोन’द्वारे होणार Pizza ते Vaccineची डिलिव्हरी; ‘स्विगी’सह 20 कंपन्या करणार प्रयोग

नवी दिल्ली – येत्या काही दिवसात पिज्जा पासून ते लशीपर्यंतची डिलिव्हरी ड्रोनद्वारे होईल. नागरी उड्डाण मंत्रालयाने 7 कंपन्यांना ड्रोनचे लांब पल्ल्याचे प्रयोग करण्यासाठी संमती दिली आहे. यात फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा देखील समावेश आहे. स्विगी Skylark सोबत मिळून हा प्रयोग करणार आहे. ही सुवीधा सुरू झाल्यास वेळेची बचत होईल आणि नागरिकांना उत्तम सुविधा मिळेल असे सांगितले जात आहे.

मारूत ड्रोनटेक मेडिकल वितरण वर काम करतेय –

मारूत ड्रोनटेकला BVLOS ची परवानगी मिळाली आहे. ते तेलंगना सरकारसोबत मेडिकल सप्लाई डिलिव्हरीवर काम करत आहेत. कोविड दरम्यान देखील या कंपनीने बरेच काम केले आहे. यात त्यांचे जवळपास 52 ड्रोन काम करत आहेत. मारूत ड्रोनटेकने लशीच्या वितरणासाठी इच्छा व्यक्त केलीय. या व्यतिरिक्त AutoMicroUAS, Centillion Networks, Terradrone, Virginatech या कंपन्यांनादेखील BVLOS ची परवाणगी मिळाली आहे.

आतापर्यंत 20 कंपन्यांना मिळाली परवानगी –
गेल्या वर्षी 13 कंपन्यांना ड्रोनने वितरण करण्याची परवाणगी मिळाली होती. या कंपनींना परवानगी देण्याआधी स्पाइसजेट च्या डिलिव्हरी विंग SpiceXpress ला DGCA द्वारे परवानगी देण्यात आली होती. त्याचबरोबर आतापर्यंत एकूण 20 कंपन्यांना याप्रकरची परवानगी मिळाली आहे.

ड्रोनद्वारे होणार लशीची डिलिव्हरी –

नागरी उड्डाण महानिदेशालयाने (DGCA) स्पाइसजेट विमान कंपनीच्या कार्गो इकाइ Spicexpressला ड्रोनद्वारे इ-काॅमर्स पार्सल डिलिव्हरीची परवानगी मे महिन्यात दिली होती. DGCA द्वारे देण्यात आलेल्या या परवानगीनंतर आता स्पाइसजेट ड्रोन च्या मदतीने इ-काॅमर्स पार्सल, मेडिकल, फार्मा आणि अन्य आवश्यक वस्तुंचे वितरण करेल.

काय आहे BVLOS?

ड्रोन इंडस्ट्री (Drone Policy)मध्ये संशोधन करत आहेत, ज्यामुळे मानवरहित एरियल व्हिकल्स (UAV’s) ला अधिक दक्षतेने पोहोचवले जाईल. BVLOS फ्लाइट्स ला विजुअल रेंज च्या पुढे देखील उडवले जाऊ शकते. सोबतच यामुळे ड्रोन्सला लांबचा पल्ला निर्धारित करण्यासाठीही मदत मिळेल. याचा वेगवेगळ्याप्रकारे उपयोग केला जावू शकतो.

Leave a Comment