PM Kisan Scheme मधून वगळण्यात आली शेतकऱ्यांची नावे ! तुम्हीही अपात्र ठरला असाल तर ‘हे’ नक्की करा नाहीतर होईल नुकसान

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेचे नियम आणि कायदे अतिशय कडक झाले आहेत. प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरीफाईड आणि महत्वाचे मानले जात आहे.प्रत्येक पेपरची कसून छाननी केली जात आहे. याचा परिणाम असा आहे की अनेक शेतकरी पात्रता अटींची पूर्तता करण्यास सक्षम नसल्यामुळे त्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले आहे. एकट्या बिहारमधून ८१,००० शेतकरी योजनेस अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांची चौकशी केली असता ते आयकराच्या कक्षेत येत असल्याचे समोर आले. अशा स्थितीत तुम्हीही एकदा तुमचं नाव तपासून पाहू शकता जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे कि नाही याबाबत स्पष्टता येईल.

यासाठी तुम्हाला फक्त हे तपासावे लागेल की तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र आहात की नाही? जर तुम्ही पात्र असाल तर काळजी करण्याची गरज नाही कारण तुमच्या हप्त्याचे पैसे यामुळे थांबणार नाहीत. तर सर्वप्रथम हे जाणून घ्या की पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी कोणत्या श्रेणीतील लोक पात्र आहेत.त्यानंतर तुम्ही जर या योजनेसाठी अपात्र ठरला असाल तर काय कराल याबाबत जाणून घ्या. | PM Kisan Scheme

पात्र नसल्यास काय करावे ?
जर तुम्ही PM किसान योजनेसाठी पात्र नसाल आणि त्याचा लाभ घेत असाल तर तुम्ही ती ताबडतोब सरेंडर (सोडा) करा. तुम्ही या योजनेचा जितका जास्त फायदा घ्याल, तितका तुमच्याकडून वसूल होण्याचा धोका जास्त असेल. सरकार तुमच्याकडून प्रत्येक पैशाचा हिशेब घेईल. अशा परिस्थितीत पीएम किसान योजना कशी सोडायची हे तुम्हाला माहित असले पाहिजे.

PM Kisan Scheme कशी सरेंडर करावी
पीएम किसान वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in/
वेबसाइटवर खाली स्क्रोल करा आणि वॉल्युंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनेफिट्स टॅबवर क्लिक करा
नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा, कॅप्चा कोड भरा आणि OTP मिळवा
एकदा तुम्ही ओटीपी एंटर केल्यावर तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत हे दिसून येईल
तुम्हाला ‘Do you want to surrender your PM Kisan Benefits’ असे लिहिलेले दिसेल. surrender करण्यासाठी, होय वर क्लिक करा आणि OTP टाका. यामुळे तुमचे पीएम किसान खाते बंद होईल.