Photos: पंतप्रधान मोदींनी गायींना खाऊ घातला चारा; पाहा फोटो

नवी दिल्ली – मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी आज रविवारी गायींना चारा खाऊ घातला. पीएम मोदींनी गायींना चारा खाऊ घालतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.

PM Modi fed fodder to cows on Makar Sankranti

पीएम मोदींचे गायीबद्दलचे प्रेम पहिल्यांदाच समोर आलेले नाही. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला पीएम मोदी वारंगल शहरातील भद्रकाली मंदिरात गायीची सेवा करताना दिसले होते.

PM Modi fed fodder to cows on Makar Sankranti

पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी शनिदेवाला भेटायला त्यांचे वडील सूर्यदेव भेटायला येतात.

PM Modi fed fodder to cows on Makar Sankranti

पंतप्रधान मोदी मोठ्या प्रेमाने गायीला गवत खाऊ घालत असल्याचे चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी पीएम मोदींच्या आजूबाजूला गायींचा कळप दिसतो.

PM Modi fed fodder to cows on Makar Sankranti

पोंगल समारंभात पंतप्रधान मोदींनी भेट दिली शाल –
केंद्रीय राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी आयोजित पोंगल उत्सवात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या मुलीला पंतप्रधान मोदींनी स्वतःची शाल भेट दिली. गायिकाने पीएम मोदींच्या पायाला स्पर्श केला, त्यानंतर पीएम मोदींनी तिला बक्षीस म्हणून शाल दिली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, काल देशात लोहरी सण साजरा करण्यात आला. काही लोक आज मकर संक्रांत साजरी करत आहेत आणि उद्या अनेकजण ती साजरी करतील. या सणांसाठी मी देशवासियांना शुभेच्छा देतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला माझ्या कुटुंबासोबत पोंगल साजरे केल्यासारखे वाटते. तुम्हा सर्वांना पोंगलच्या शुभेच्छा! या शुभ प्रसंगी तुमचे जीवन सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो हीच सदिच्छा. आज मला असे वाटते की मी माझ्या कुटुंबासोबत पोंगल साजरा करत आहे.