“100 दिवसांच्या अजेंड्यावर काम करावे लागेल”; संभाव्य मंत्र्यांना नरेंद्र मोदींचा मंत्र

PM Modi Oath Ceremony । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, त्यांनी 7 लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी निवडक खासदारांसोबत चहापानावर चर्चा केली. आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात या ‘टी पार्टी’मध्ये उपस्थित असलेले नेते पंतप्रधान मोदींसोबत मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले  जात आहे. या दरम्यान पंतप्रधानांनी या खासदारांना प्रशासनाकडे लक्ष देण्यास आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील याची खात्री करण्यास सांगितले.

कोणते खासदार उपस्थित होते PM Modi Oath Ceremony ।
पंतप्रधान निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, शिवराज सिंह चौहान, अर्जुन राम मेघवाल, ज्योतिरादित्य सिंधिया, पंकज चौधरी, राव इंद्रजित सिंग, बी.एल. वर्मा आणि अन्नपूर्णा देवी यांचा समावेश होता.

याशिवाय जितीन प्रसाद, अजय टमटा, चिराग पासवान, जी. किशन रेड्डी, बी. संजय कुमार, मनसुख मांडविया, जयंत चौधरी, मनोहर लाल, रामदास आठवले, गजेंद्र सिंह शेखावत, जितन राम मांझी, सर्बानंद सोनोवाल, एच.डी. कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, हर्ष मल्होत्रा, रक्षा खडसे, नित्यानंद राय यांचाही समावेश होता.

नरेंद्र मोदी संध्याकाळी 7.15 वाजता घेणार शपथ
आज संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी सोहळ्याची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. त्यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि मित्र पक्षांचे अनेक खासदारही आज मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. टीडीपीकडून राम मोहन नायडू आणि पेमसानी चंद्र शेखर मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे समोर आले आहे.

महात्मा गांधी स्मृतीस्थळला भेट  PM Modi Oath Ceremony ।
आज सकाळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकालाही भेट देऊन शहीद जवानांना आदरांजली वाहिली. त्यांनी सर्वप्रथम महात्मा गांधींची समाधी असलेल्या राजघाटावर पोहोचून राष्ट्रपिता यांना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ‘सदैव अटल’ यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.