पूजा सावंतची होणाऱ्या नवऱ्यासाठी रोमॅंटिक पोस्ट; म्हणाली ‘आता मला कळलं…’

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र मागील काही दिवसांपासून ती खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली. यानंतर आता तिने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री पूजा सावंतच्या होणाऱ्या पतीचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे. तिने इंस्टाग्रामवर सिद्धेश चव्हाणसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती सिद्धेशच्या मांडीवर बसून त्याच्या डोळ्यात पाहताना दिसत आहे. हा खूपच रोमँटिक फोटो आहे. हा फोटो शेअर करत लिहिले की, आता मला कळलं, मी कुठे असले पाहिजे. माझी जागा तुझ्या हृदयात आहे’. या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. सध्या हा फोटो चाहत्यांही पसंतीस पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण डिझ्नी कंपनीत असल्याच्या चर्चा आहेत. तसेच तो विदेशात राहतो असेही म्हंटले जात आहे. पूजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, मराठी इंडस्ट्रीतील ती आघाडीची अभिनेत्री आहे. तिने क्षणभर विश्रांती चित्रपटातून पदार्पण केले. तसेच तिने जंगली या हिंदी चित्रपटात काम केले आहे. आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने उत्तम भूमिका साकारली आहे.