46 वर्षांपूर्वी प्रभात : पंतप्रधानांचा फोटो जाहिरातीत वापरणे गुन्हा

1 हजार व त्यावरील रकमेच्या नोटा चलनातून बाद

नवी दिल्ली, दि. 15 – राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकुमान्वये 1000, 5000 व 10,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात आल्या आहेत. या वटहुकुमाची अंमलबजावणी त्वरित होणार आहे. या नोटा बेकायदेशीर ठरविण्यात आल्या असून उद्याचा दिवस सर्व बँका व सरकारी कोषागारांना सुट्टीचा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. ज्या व्यक्तींकडे या नोटा असतील त्यांनी त्या 18 व 19 जानेवारी रोजी रिझर्व्ह बँक अथवा रिझर्व्ह बँकेने सांगितलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकात वटवून दुसरे चलन घेता येईल.

मुंबई व कलकत्यात नवीन उद्योगांना मनाई

औरंगाबाद – मुंबई व कलकत्ता या सारख्या शहरात नवीन उद्योगांना मान्यता न देण्याचे केंद्राचे धोरण असून तशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत. येथे एका डीझेल इंजिन प्रकल्पाचे उद्घाटन करताना फर्नांडिस म्हणाले, तसा उद्योग या शहरात उभा राहिलाच तर त्याला वीज व पाणी पुरविण्यात येणार नाही. राज्यांनी हा नियम न पाळल्यास केंद्र दुसरे हत्यार उचलेल.

पंतप्रधानांचा फोटो जाहिरातीत वापरणे गुन्हा

नवी दिल्ली – काही खासगी कंपन्या व उद्योगभवन पंतप्रधानांचे नाव व फोटो वापरतात. मात्र तसे करणे गुन्हा आहे.