nagar | प्रेशर कुकर’ने विरोधी उमेदवारांचे वाढले ब्लड प्रेशर

नेवासा, – शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या राजकीय रणांगणात होत असलेल्या तिरंगी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रेशर कुकर’ने विरोधी उमेदवारांचे चांगलेच ब्लड प्रेशर वाढत असल्याचे दिसून येत आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये रुपवते यांना मतदारांची सहानुभूती मिळत असताना आर्थिक मदतही दिली जात असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ना..आजी…ना…माजी उत्कर्षा रुपवते मारणार बाजी असेच चित्र राजकीय रणांगणात दिसून येत आहे.

उबाठा सेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयाची धुरा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हातात गेल्यामुळे निवडणूक प्रचार यंत्रणाही महाविकास आघाडीचेच नेतेमंडळी चालविताना दिसून येत आहे. काही कार्यकर्त्यांचे फोनही घेत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची प्रचार यंत्रणा मोठी सक्रिय असली तरी पदाधिकाऱ्यांत माञ ताळमेळ राहिला नसल्याचे दिसून येत आहे. पाच – दहा कार्यकर्ते एका जीवाने काम करत असताना दुसरे कार्यकर्ते पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांवर नाराज असल्यामुळे त्यांना निरोप मिळत नसल्यामुळे ते नाराज आहे.

निवडणूक काळात पदाधिकारीच एकमेकांवर कुरघोड्या करताना दिसून येत आहेत. वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांची निवडणूक थेट जनतेनेच हातात घेतलेली आहे. त्यांचा संपूर्ण दौराही शिर्डी मतदारसंघात झालेला नसताना त्यांना जनतेची मोठी सहानुभूतीची लाट मिळताना दिसत असल्यामुळे त्यांच्या प्रेशर कुकरने विरोधी उमेदवारांचे ब्लड प्रेशर वाढताना दिसून येत आहे.