1 एप्रिलपासून दूध, फ्रिज, टीव्हीसह ‘या’ वस्तूंच्या किंमतीत होणार ‘वाढ’; जाणून घ्या कोणत्या वस्तूंचा आहे समावेश

नवी दिल्ली – काही दिवसातच एप्रिल महिन्याची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या महिन्याच्या सुरुवातीला बऱ्याच दैनंदिन वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. दैनंदिन वस्तूंच्या किमतीत वाढ झाली की सर्वसामान्य लोकांच्या जीवनात या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी कसोटी सुरु होते. त्याचबरोबर या दरवाढीमुळे सर्व लोकांच्या खिश्याला कात्री लागते. अगोदरच सततच्या पेट्रोल आणि गॅस दरवाढीमुळे जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे.

अशात आता पुन्हा एकदा दरवाढ होणार आहे. यामध्ये 1 एप्रिलपासून दूध, एअर कंडिशनर (एसी), फॅन, टीव्ही, स्मार्टफोन इत्यादी वस्तूच्या किंमती वाढणार आहेत. तसेच हवाई भाडे दरवाढीवरुन तुम्हाला टोल टॅक्स आणि वीज दरवाढीसाठी जास्त पैसे आकारले द्यावे लागतील. चला तर मग जाणून घेऊया 1 एप्रिलपासून काय महाग होईल आणि त्यासाठी आपल्याला किती पैसे मोजावे लागतील.

3 रुपयांनी वाढतील दुधाचे दर
दूध व्यापाऱ्यांनी 1 एप्रिल पासून दूधाचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांची मागणी होती की दूधाला प्रति लीटर 55 रुपायांचा दर मिळावा. परंतु व्यापाऱ्यांचे म्हणने आहे की, ते दूधाच्या किंमतीत केवळ 3 रुपायांनी वाढ करतील. हे वाढीव दर 1 एप्रिलपासून लागू केले जातील. त्यामुळे येत्या एक तारखेपासून तुम्हाला एक लीटर दूधाकरिता 49 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.

एक्सप्रेस-वे वर प्रवास करणे पडणार महागात
आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर प्रवास करणे आता महागात पडणार आहे. सन 2021-22 या वर्षासाठीचे नवीन दर उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण मंडळाने मंजूर केले आहेत. या नवीन दर नियमानुसार कमीत कमी 5 रुपय आणि जास्तीत जास्त 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.

हवाई प्रवास महाग होणार
जर तुम्ही अनेकदा विमानाने प्रवास केला असेल तर तुम्हाला धक्का बसणार आहे. कारण लवकरच उड्डान करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने देशांतर्गत उड्डाने करण्याकरिता कमी असलेल्या भाड्यांची मर्यादा 5 टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एव्हिएशन सिक्युरिटी फी देखील वाढवली जाणार आहे. देशांतर्गत उड्डाणांसाठी विमान वाहतूक सुरक्षा फी 200 रुपये आकारली जाण्याची शक्यता आहे. सध्या ही फी 160 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांकरिता फी 5.2 वरुन 12 डॉलरपर्यंत वाढवण्यात येईल. हे नवीन नियम 1 एप्रिल पासून लागू होतील.

टीव्हीच्या किमतीत होणार इतकी वाढ
पुढील महिण्याच्या पहिल्या तारखेपासून जे ग्राहक टीव्ही घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण पुढील महिण्यापासून टीव्हीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टीव्हीच्या किंमतीत 2000 ते 3000 रुपयांनी वाढ होऊ शकते.

AC, फ्रिज, कुलर यांच्या किंमती वाढणार
या वर्षीचा उन्हाळा कसा असणार आहे, हे जरी माहित नसले तरी या वर्षीच्या उकाड्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला AC, फ्रिज, कुलर या वस्तू खरेदी करताना चटके मात्र नक्कीच बसणार आहेत. कारण पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून या वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. AC, फ्रिज आणि कुलर या वस्तू तयार तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यासुद्धा 4 ते 6 टक्क्यांनी दर वाढ करण्याचा विचार करत आहेत. प्रति युनिट एसीची किंमत 1500 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढू शकते.

Leave a Comment