पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय ! अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देणार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी शौर्य दिनानिमित्त अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे देणार आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शौर्य दिवस म्हणून साजरी केली जाते.या दिवसाचे महत्व ओळखून ही घोषणा करण्यात येणार आहे.

आज शौर्य दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या दरम्यान अंदमान आणि निकोबारमधील 21 सर्वात मोठ्या बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे दिली जातील. नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर बांधण्यात येणाऱ्या नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचेही पंतप्रधान मोदी अनावरण करतील. अशी माहिती पीएमद्वारे देण्यात आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या व्या जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील हजेरी लावणार आहेत.

या परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे ठेवली जाणार
बेटांना 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे देण्यात येणार आहेत. ती पुढीलप्रमाणे -मेजर सोमनाथ शर्मा, सूबेदार मानद कॅप्टन,करम सिंह, एमएम द्वितीय लेफ्टिनेंट रामा राघोबा राणे, नायक जदुनाथ सिंह, हवलदार मेजर पीरू सिंह कॅप्टन जीएस सलारिया, लेफ्टिनेंट कर्नल (तत्कालीन मेजर) धन सिंह थापा, सूबेदार जोगिंदर सिंह, मेजर शैतान सिंह, अब्दुल हमीद, लेफ्टिनेंट कर्नल अर्देशिर बुर्जोरजी तारापोर, लांस नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंह, सेकेंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग अधिकारी निर्मलजीत सिंह सेखों, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सूबेदार बाना सिंह, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टिनेंट मनोज कुमार पांडे, सूबेदार मेजर (तत्कालीन राइफलमैन) संजय कुमार आणि सूबेदार मेजर सेवानिवृत्त ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांच्या नावांचा समावेश आहे.