पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलून गेले ,’गांधींना कोणी ओळखत नव्हतं, चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली’

Lok Sabha Election 2024 देशात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता येत्या १ जूनला पार पडणार आहे. या अगोदर सहा टप्प्यातील मतदानात सर्व पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जूनला घोषित होणार आहे. यादरम्यान सर्व राजकीय पक्ष आपल्याच जागा जिंकणार असल्याचा दावा करतांना दिसत आहे. तर राजकीय नेते वृत्त माध्यमांना मुलाखतीतून आपली भूमिका मांडताना दिसत आहे अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृत्त वहिनीला दिलेली मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे.

मुलाखती दरम्यान मोदी यांनी  विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,’ महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं विधान मोदी यांनी केलं आहे. तसेच गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केलं नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मुलाखत पुढे म्हणाले,’महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही.’ असेही मोदी म्हणाले.