1,15,90,715 डाॅलरला विकले चर्चिलचे चित्र; पाहा काय आहे या चित्रात

लंडन – ब्रिटनचे दिवंगत पंतप्रधान विन्सटन चर्चिल यांनी काढलेल्या एका चित्राला लिलावात तब्बल 1.5 कोटी डॉलरची किंमत मिळाली आहे. हॉलीवुड स्‍टार एंजेलिना जोली हिने हे चित्र लिलावात विक्रीसाठी दाखल केले होते.

लंडनच्या क्रिस्टीज या लिलाव घरात टावर ऑफ द कोउटोउबिया मॉस्क’ या नावाने ओळखले जाणारे हे चित्र 82,85,000 पाउंड म्हणजेच 1,15,90,715 डॉलरला विकले गेले. लिलावापूर्वी या चित्राला 15 लाख पाउंड ते 25 लाख पाउंड किमान किंमत ठरवण्यात अली होती.

हे चित्र प्रथम अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्याकडे होते. त्यांच्या पुत्राने १९४५ मध्ये हे चित्र प्रथम विकले. नंतरच्या काळात अनेकांनी हे चित्र खरेदी केले अभिनेत्री अँजेलिना जॉली आणि तिचा प्रियकर अभिनेता ब्रॅड पिट यांनी 2011 मध्ये हे चित्र खरेदी केले होते. 2019 मध्ये हे जोडपे अलग झाले होते. त्यानंतर अँजेलिनाने हे चित्र विकण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे हे चित्र लिलावात विकण्यात आले.

यापूर्वी चर्चिलच्या एका चित्राला 18 लाख पौंड किंमत मिळाली होती. त्यामुळे अँजेलिनाने विकलेल्या चित्राला सर्वात जास्त किंमत मिळाल्याची नोंद झाली आहे.

Leave a Comment