साताऱ्याच्या जागेवर कोण होणार उमेदवार? ; जयंत पाटील-पृथ्वीराज चव्हाण यांची बंद दाराआड चर्चा

Prithviraj Chavan । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगली आणि इतर दोन लोकसभा मतदारसंघांवरील गोंधळ दूर करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही वेळानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी चव्हाण यांची कराडमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असून यावेळी काय बोलणी झाली याची माहिती गुलदस्त्यात आहे.

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने सातारच्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरलीय.

जयंत पाटील-पृथ्वीराज चव्हाण यांची बंद दाराआड चर्चा Prithviraj Chavan ।
कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार चव्हाण म्हणाले की, सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या (एसपी) अंतर्गत येत असल्याने. या जागेवर उमेदवार शरद पवार ठरवतील. काँग्रेसच्या काही नेत्यांनी मविआच्या मित्रपक्षांसोबत वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढण्याच्या प्रस्तावावर बोलण्यास नकार दिलाय असे चव्हाण यांनी म्हटलंय. जयंत पाटील यांच्या भेटीविषयी बोलताना, साताऱ्यात योग्य आणि तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे.’ असे म्हटले.

शरद पवार उमेदवार ठरवतील Prithviraj Chavan ।

पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू आहे का, असा प्रश्न विचारला असता. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की, हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या (शरद पवार) कोट्याचा भाग असून शरद पवार उमेदवार ठरवतील” असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा 
सातारा लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ; श्रीनिवास पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार