Lok Sabha Election 2024 : “संविधान वाचवण्यासाठी मोदींचा पराभव होणं गरजेचं’; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

Prithviraj Chavan On Naredra Modi | Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या काळातील कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुण्यात पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद सुरु होती. तिथे ते बोलत आहेत. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केलं.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “पंतप्रधान मोदी म्हणाले होते… शंभर दिवसात परदेशातला काळा पैसा आणतो आणि ५ लाख देतो म्हटले तो जुमला होता. भारत सरकारकडे काळा पैशाबाबतची माहिती आहे पण कारवाई झाली नाही. आमचा आरोप आहे मोदींकडे कागदपत्रे असताना कारवाई झाली नाही. तोडपाणी झालेली आहे. अशी जोरदार टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

शेतकर्‍यांत मोदी सरकारने विष कालवलं आहे. रोजगार देतो म्हटले पण दिले नाही. शेतीमालाचे भाव पाडले. मोदी सरकार शेतकर्‍यांवर सूड घेत घेत आहे. मोदींचा अपमान झाला म्हणून. मोदी म्हटले आतंकवाद संपेल तो संपला नाही. मागे दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही.

मग आता दिलेली आश्वासने कशी पूर्ण होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेचा विकास मंदावलेला आहे. ते मान्य करत नाहीत. ते पाठ थोपटून घेतात. देशावर २०६ लाख कोटी कर्ज असून आर्थिक नैतिक भ्रष्टाचार सुरु आहे.

मोदींनी आॕपरेशन कमळ केलं. आमदारांची खासदारांची खरेदी विक्री केली. आमदार गेले. मतदार गेले नाहीत. नरेंद्र मोदी हुकुमशाहीच्या दिशेने जात आहेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव होणं गरजेचा आहे. असं देखील यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.