‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरचा आणखी एका पुरस्काराने सन्मान

Actor Priyadarshini Indalkar | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. या शोमधील सर्व कलाकारांना प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर देखील सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. नुकतेच तिला सर्वात्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या संदर्भात एक खास पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

प्रियदर्शनी इंदलकरला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, पुणे शाखा कै. इंदिरा चिटणीस स्मृति विनोदी अभिनेत्रीच्या पुरस्कार गौरविण्यात आले आहे. याचे फोटो प्रियदर्शनीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसेच तिने कुटुंबासोबतचे फोटो देखील शेअर केला आहे.

सोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, पुणे शाखा कै. इंदिरा चिटणीस स्मृति विनोदी अभिनेत्री पुरस्कार…या सन्मानासाठी माझी निवड केल्याबद्दल शतशः आभार!…हास्यजत्रेशिवाय हे शक्य नव्हतं… सचिन गोस्वामी व सचिन मोटे तुम्हा दोघांमुळे आजपर्यंत अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. तुमच्या हातून घडल्याची आणखीन एक पोचपावती.” या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यापूर्वी ‘फुलराणी’ या मराठी सिनेमासाठी प्रियदर्शनीला बेस्ट डेब्यू अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘फुलराणी’ सिनेमात प्रियदर्शनीसोबत अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका होती. या सिनेमातले संवाद, प्रियदर्शनीचा अभिनय याची बरीच चर्चा झाली होती.

दरम्यान, प्रियदर्शनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, २६ जानेवारीला तिचा ‘नवरदेव’ नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात प्रियदर्शनी अभिनेता क्षितीज दाते आणि मकरंद अनासपुरेसोबत झळकली होती.

हेही वाचा: 

मायावती मुस्लिमांवर का नाराज आहेत? ; आकडेवारीवरून समजून घ्या राज्यातील जातीय समीकरण