priyanka chopra । … अन् प्रियांका चोपडा शाहिद कपूरसोबत अफेअर्सच्या चर्चांवर संतापली

priyanka chopra  । लग्नापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव अनेक स्टार्ससोबत जोडले गेले. शाहिद कपूरसोबतच्या तिच्या अफेअरचीही चर्चा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की, जेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची टीम प्रियंका चोप्राच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचली तेव्हा दरवाजा शाहिद कपूरने उघडला होता. तो तिच्या घरी आधीच हजर होता. प्रियंका चोप्राने एकदा या प्रकरणावर उघडपणे  आपली बाजू मांडली होती.  शाहिद तिच्या घरी नव्हता पण इन्कम टॅक्स टीम आल्यानंतर तिने शाहिद कपूरला फोन केला होता. असेही तिने सांगितले होते.

2011 मध्ये प्रियांका चोप्रा तिच्या ‘7 खून माफ’ या चित्रपटाचे प्रमोशन करत होती.  त्यादरम्यान तिने एका शोमध्ये शाहिद कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलली होती. प्रियंकाने  सांगितले की, ‘माझ्या आणि शाहिदच्या अफेअरच्या अनेक बातम्या आल्या या मुळे मला फार त्रास झाला’

प्रियंकाने पुढे सांगितले,’ एका मुलीच्या अफवेवर तुम्ही चर्चा करता जी तिच्या आई-वडिलांसोबत घरी राहते आणि मी पण कोणाची तरी मुलगी आहे. मी कोणाची तरी बहीण आहे. स्वस्तातल्या बातम्या ज्या पद्धतीने मांडल्या गेल्या, हे पूर्णपणे चुकीचे आहे.’ असं म्हणत तिने संताप व्यक्त केला होता.

शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी ‘कमिने’ आणि ‘तेरी मेरी कहानी’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले. दरम्यान, त्यांच्या नात्याची बातमी पसरली होती. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी केली नाही. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांका चोप्रा लवकरच ‘जी ले जरा’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील आहेत. याशिवाय प्रियांका चोप्राकडे ‘हेड्स ऑफ स्टेट’ हा चित्रपटही आहे.