संभाव्य “जॉर्ज’ पडद्याआड गेला

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर शिवसेनेने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. यात त्यांनी आगामी काळात जॉर्ज फर्नांडिस यांच्या बायोपिकमध्ये सुशांतसिंह राजपूत हा संभाव्य “जॉर्ज’ म्हणून डोक्‍यात असल्याचाही मोठा खुलासा केला. तसेच सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरही ताशेरे ओढले आहे.

संजय राऊत म्हणाले, “ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती संपल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बायोपिक करण्याचे ठरले. जॉर्ज यांची भूमिका करणारे चेहरे म्हणून 2-3 अभिनेत्यांची नावे समोर आली. त्यात सुशांतचे नावही होते. पण सध्या त्याची मानसिक अवस्था चांगली नाही. तो डिप्रेशनमध्ये आहे. अनेक मोठ्या प्रॉडक्‍शन हाऊसने याच कारणांमुळे त्याच्याशी करार मोडले. त्यानंतर दोन महिन्यांत सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली. त्यामुळे संभाव्य “जॉर्ज’ पडद्याआड गेला.

दरम्यान, सुशांतकडे काम नव्हते हे खोटे ठरत आहे. त्याची आर्थिक स्थितीही उत्तम होती. तो राहात असलेल्या घराचे भाडे 5 लाखांच्या आसपास होते. त्याच्याकडे महागड्या गाड्या होत्या. तो महिन्याला 10 लाख रुपये खर्च करत होता असे प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे तो त्याचा आनंद घेत होता. माझ्या वाचनात आले की, प्रत्यक्षात यश राज प्रोडक्‍शनने सुशांतशी केलेल्या कराराचा पोलीस तपास करत आहेत. या कराराच्या प्रती पोलिसांनी मागवल्या आहेत. या करारांतून कोणते धागेदोरे मिळणार आहेत?, असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

Leave a Comment