भाजपने जाणून घेतल्या शेवाळेवाडी गावातील समस्या

हडपसर – शेवाळेवाडी गाव नुकतेच महापालिकेत समाविष्ट झाले आहे. भारतीय जनता पार्टीने या समाविष्ट गावाच्या समन्वयाची जबाबदारी नगरसेविका कालिंदा पुंडे यांच्यावर दिली आहे. त्यानुसार पुंडे यांनी शेवाळेवाडी गावाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभारी म्हणुन त्यांची नेमणुक झाली आहे. शेवाळेवाडी गावातील रस्ते, लाईट,पाणी आणि इतर समस्या जाणुन घेण्यासाठी त्यांनी गावात भेट दिली.

गावातील नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून गावात आधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन नगरसेविका पुंडे यांनी दिले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा शेवाळे, भाजपा कँटोन्मेंट अध्यक्ष महेश पुंडे, हवेली अध्यक्ष धनंजय कामठे, माजी सरपंच प्रतिमा शेवाळे, दिनेश भंडारी, सूरज बिरे, मांजरी बुद्रुक गावचे सरपंच शिवराज आप्पा घुले, समीर घुले, संजय कारले, संजय कोद्रे, विलास आबा शेवाळे, प्रीतम शेवाळे, एम के पांडे, प्रसाद प्रीतिष, राजेंद्र शेवाळे, नवनाथ शेवाळे, वर्षा कारले, रसिका कुंभारकर,महेश आप्पा कारले, निलेश जराड, विपुल जाधव, भारत कोद्रे, राम खेडेकर, पोलीस पाटील अमृता अलंकार खेडेकर, प्रतिक खेडेकर, शाम यादव, अविनाश भंडारी, कैलाश जैस्वाल, योगेश ढोरे, श्यामराव खवले उपस्थित होते.

दरम्यान, गावात आवश्यक असलेली विकास कामे आणि त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देता येईल का, नागरिकांना आधिकाअधिक सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील याविषयी राहुल शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.