satara | माणगंगा शैक्षणिक संकुलाचे व्यावसायिक घडविण्याचे काम

म्हसवड, (प्रतिनिधी)- माणगंगा शैक्षणिक संकुलात व्यवसाय प्रशिक्षण देऊन व्यावसायिक पिढी घडवण्याचे काम संस्था करीत आहे, असे मत आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांनी केले.

मासाळवाडी (म्हसवड) येथील माणगंगा शैक्षणिक संकुलामध्ये जालेल्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात नितीन वाघमोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नितीन दोशी होते. राज्य व्यवसाय प्रशिक्षण संघटनेचे अध्यक्ष सुहास पाटील, सुनील पोरे, राज सोणवले, संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंत मासाळ आदी उपस्थित होते.

नितिन वाघमोडे म्हणाले, या संकुलात प्रशिक्षण घेतलेला डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन, नर्सिंग विद्यार्थ्यांना मोठया शहरात मागणी आहे. हे संकुल नक्कीच उंच शिखरावर पोहचेल.सुहास पाटील, नितीन दोशी यांची भाषणे झाली. अध्यक्ष डॉ. वसंत मासाळ यांनी संस्थेची स्थापना ते आतापर्यंतचा प्रवास सांगितला.

डॉ. अनिता दादासाहेब खरात, अप्पासाहेब घुटुगडे, डॉ. अवधूत खाडे, डॉ. नेहा खाडे, डॉ .अनिता घुटुकडे, विक्रम शिंगाडे, साखरे गुरुजी, त्रिगुणे गुरुजी, फुटाणे, नगरसेवक जगन्नाथ लोखंडे, अजिम तांबोळी, म्हसवड मेडिकल असोसिएशनचे बहुतांश डॉक्टर्स, शैक्षिणक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. चित्रफितीच्या माध्यमातून संस्थेचे कामकाज दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांचे कलागुण यावेळी सादर झाले. संस्थेचे सहसंचालक रावसाहेब मासाळ यांनी प्रास्ताविक केले.