पुण्यातील साळुंखे विहार परिसरातील”स्पा’मध्ये वेश्‍या व्यवसाय

 

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 – साळुंके विहार परिसरात “स्पा सेंटर’च्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. या कारवाईत पाच आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली असून, वेश्‍या व्यवसायातून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

“स्पा’ व्यवस्थापक झारणा ऊर्फ पिंकी गौतम मंडल (रा. कोंढवा मुळ रा. पश्‍चिम बंगाल), सुमित अनिल होनखंडे (रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. स्पा मालक रचना संतोष साळुंखे (रा. येवलेवाडी), सार्थक लोचन गिरमे (रा. वानवडी) आणि लोचन अनंता गिरमे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळुंखे विहार या उच्चभ्रू परिसरात “गोल्डन टच स्पा’ नावाचे मसाज सेंटर आहे. या मसाज सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने माहितीची खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवून माहिती घेतली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करुन पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे