PUNE : कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी लिहून व्यापऱ्याकडे मागितली खंडणी; आरोपीला अटक

पुणे – एक व्यावसायिकाच्या कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून दहा लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. दहा लाख रुपये न दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने याबाबत एका अज्ञात आरोपीवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

श्रीनाथ शेडगे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याला वेळापूर अकलूज येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुण झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. मात्र कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने ही शक्कल लढवली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.