पुणे : जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी

आक्षेपार्ह टिप्पणी : भाजपच्यावतीने आंदोलन

पुणे – प्रभू श्री रामचंद्र यांच्याविषयी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. शिवाय, ते सतत हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्ये करून भावना दुखावून राज्यात अशांतता निर्माण करत आहेत. त्यमुळे जितेंद्र आव्हाड यांना आम्ही पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.

आमदार आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा निषेधार्थ गुरुवारी भाजपच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनास कॅन्टोमेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे ,

माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, दीपक पोटे, युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, सुभाष जंगले, राजेंद्र शिळीमकर, राघवेंद्र मानकर, राहुल भंडारे, वर्षा तापकीर, करण मिसाळ, हर्षदा फरांदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर पक्षाच्या वतीने पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांना निवेदन देण्यात आले.