Pune : वाद झाला, खुन केला आणि सरेंडरही झाला

पुणे- वानवडी परिसरातील एका डोंगरावर एका तरुणाचा डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला. हा खून पाच अल्पवयीन मुलांनी केला. यातील एका मुलाने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर राहून खूनाची कबुली दिली. यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

महानंद मोरे (27,रा.काळेपडळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो एका कंपनीत ऑफीस बॉयचे काम करतो. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महानंद मोरे हा रात्रीच्या वेळी वानवडी परिसरातील एका डोंगरावर दारु पित बसला होता. तेव्हा ही मुले डोंगरावरील मंदिरातून देव दर्शन घेऊन परतत होती. त्यांच्याशी महानंदचा वाद झाला. या वादात मुलांनी महानंदला दगड मारले. एक दगड डोक्‍यावर लागल्याने तो रकतबंबाळ झाला.

तो ही माहिती पोलिसांनी देईल या भितीने मुलांनी आणखी दगडे मारुन व मारहाण करत त्याचा खून केला. दरम्यान यातील एका घाबरलेल्या मुलाने याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महानंदचा मृतदेह ताब्यात घेतला. या पाच मुलांपैकी एक मुलगा शाळेत जातो तर इतर मिळेल ती कामे करतात. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.