पुणे : नव्या बाधितांचे प्रमाण हजाराच्या आत

पुणे- करोना बाधितांचे प्रमाण हजाराच्या आत आले असून, गेल्या 24 तासांत 776 नवे बाधित आढळले आहेत. तर राज्यात 6 हजार 436 नव्या बाधितांची नोंद झाली आहे.

पुणे शहर हद्दीत गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू झाला आहे; तर हद्दीबाहेर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 24 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरात दिवसभरात 5 हजार 657 संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे. तर 2 हजार 056 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 6 लाख 29 हजार 922 बाधित बरे झाले आहेत; तर 6 लाख 52 हजार 292 जणांना करोनाची लागण आजपर्यंत झाली आहे. याशिवाय 9 हजार 304 बाधित मृत्यू पावले आहेत. सध्या 13 हजार 066 सक्रीय बाधित असून, 49 बाधितांची प्रकृती गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. याशिवाय 228 जणांना ऑक्‍सिजनवर ठेवण्यात आले आहे.

राज्यातही 1 लाख 06 हजार 059 सक्रीय बाधित असून, आतापर्यंत 1 लाख 43 हजार 098 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याचा मृत्यूदर 1.83 टक्के आहे. रुग्णालयात जाऊन उपचार घेणारे वाढले शहरात रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली असून, रविवारी ती पाच टक्‍क्‍यांच्या जवळपास होती. तर सोमवारी ती 6.35 टक्‍क्‍यांवर आली आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे.