Pune : कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांची नॅफकबच्या (नवी दिल्ली) उपाध्यक्षपदी निवड..

पुणे : नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स् अँड क्रेडीट सोसायटीच्या (NAFCUB) नवी दिल्ली, येथे झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांची नॅफकबचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. आज (दि.१३) ही सभा पार पडली.

यामध्ये एकूण १९ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. बिनविरोध निवडून आलेले सर्व संचालक हे ज्योतिंद्रभाई मेहता आणि एच. के. पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार आहेत.

उर्वरित ७ जागांवर नुकत्याच झालेल्या निवडणूकीत मेहता व पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार से समृध्दी २४’ या पॅनेलचे सर्व ७ उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

सदर पॅनेलची मुदत २०२४-२०२९ या ५ वर्षांच्या कालावधीची आहे.लक्ष्मी दासजी, नवी दिल्ली फेडरेशन यांची नॅफकबचे अध्यक्ष म्हणून तर सीए मिलिंद काळे यांच्याव्यतिरिक्त मुदित वर्माजी, लखनौ, उत्तरप्रदेश फेडरेशन यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

सहकारी बँकींग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी व या क्षेत्राचे भवितव्य उज्ज्वल करण्याकरिता आम्ही नॅफकबचे सर्व नवनिर्वाचित संचालक सर्वतोपरी प्रयत्न करू, असे सीए काळे यांनी आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हंटले. .