पुणे : 15 ते 18 वर्षे वयोगटासाठी आता 183 ठिकाणी कोवॅक्‍सिन लस उपलब्ध

पुणे –15 ते 18 या किशोरवयीन गटासाठी करोना प्रतिबंधक लसीकरणाचे 183 केंद्र सुरू करण्यात आले असून, आता संपूर्ण शहरात केंद्र उपलब्ध असणार आहेत.

तीन जानेवारीपासून किशोरवयीनांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. एक जानेवारीपासूनच त्याची नोंदणी सुरू झाली आहे. त्यानंतर रोज सुमारे तीन-चार हजार तरुणांचे लसीकरण केले जात आहे. या तरुणांना “कोवॅक्‍सिन’चेच डोस देणे बंधनकारक असल्याने आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र केंद्र उघडण्याच्या सूचना असल्यान्‌ एसुरूवातीला पाच आणि त्यानंतर 40 स्वतंत्र लसीकरण केंद्र यासाठी सुरू करण्यात आली होती. मात्र आता केंद्र वाढवण्यात आले आहेत.

दरम्यान, किशोरवयीन मुलांपैकी आतापर्यंत 16 टक्के मुले लसवंत झाली आहेत. जिल्ह्यात 5 लाख 53 हजार 190 मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यात ग्रामीण- 2,11, 975, पुणे मनपा- 2,24,515 आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत 1,16,700 बालके आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागातील 59,109, पुणे मनपा- 19,39 आणि पिंपरी-चिंचवडमधील 10, 479 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.