Pune Crime: विनयभंगाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

पुणे – विनयभंगाच्या गुन्ह्यात एक महिण्यापासून फरार असलेल्या गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले. गुन्हा केल्यापासून संबंधीत आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पोलीस अंमलदार ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मिळालेल्या खबरीनूसार आरोपी यासिन मोमीन (19,रा. डायसप्लॉट, गुलटेकडी) याला मार्केटयार्ड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी सहायक पोलीस निरीशक अमोल रसाळ , उपनिरीक्षक अशोक येवले आदींच्या पथकाने केली आहे.