Pune Crime : कुख्यात गुंड निलेश घायवळला माेक्का अंतर्गत अटक

पुणे – कुख्यात गुंड निलेश घायवळ  आणि त्याचे टाेळीवर पुणे पाेलीसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम(माेक्का) नुसार कारवाई करत त्यास अटक केले आहे. येरवडा कारागृहातून त्यास पाेलीसांनी ताब्यात घेतले असून पुणे ग्रामीण पाेलीसांनी नुकतेच त्याच्यावर एक वर्षासाठी एमपीडीए कायद्यानुसार स्थानबध्दतेची कारवाई केली.

निलेश घायवळ याच्यासह त्याचे साथीदार संताेष धुमाळ, मुसाब शेख यांना पाेलीसांनी अटक केली असून अक्षय गाेगावले, विपुल माझीरे, कुणाल कंधारे यांच्यासह अन्य तीनजणांवर याप्रकरणी कारवाई केलेली आहे.

काेथरुड येथे राहणाऱ्या एका गॅरेज चालक इसमाकडून भाऊच्या रॅलीसाठी गाडी पाहिजे असे म्हणून जबरदस्तीने निलेश घायवळचा प्रमुख हस्तक संताेष धुमाळ व साथीदारांनी तीन लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची 550 माॅडेलची जीप जबरदस्तीने त्यास चाॅपरचा धाक दाखवून धमकावून नेली हाेती. याप्रकरणी आराेपींवर काेथरुड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील आराेपींनी संघटित गुन्हेगारी टाेळी निर्माण करुन एकटयाने व संयुक्तरित्या स्वत:चे व टाेळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता व त्यातून आर्थीक व इतर फायदा मिळविण्याकरिता गुन्हे केले आहे. टाेळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याचे उद्देशाने संघटीत गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालु ठवेलेले आहे.

टाेळीचे वर्चस्वाकरिता खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जखमी करुन जबरी चाेरी, घातक शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हेगारी कृत्य आराेपी सातत्याने केले आहे. निलेश घायळ याचेवर आतापर्यंत दाेन खुनाचे गुन्हासह एकूण 14 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. सदर कारवाई खंडणी विराेधी पथकाचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पाेलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण यांचे पथकाने केली आहे.

Leave a Comment