Pune Crime: बिल्डरकडे 80 लाखांच्या खंडणीची मागणी, हाऊसिंग सोसायटीच्या 10 जणांवर गुन्हा

पुणे – खोट्या तक्रारी दाखल करुन विकसन प्रकल्पास स्टे आणण्याची धमकी देत एका बांधकाम व्यवसायीकाकडे 80 लाखाची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी गृहरचना संस्थेच्या 9 ते 10 सदस्यांविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार लाखांची खंडणी टोकण रक्कम म्हणून आरोपींनी स्विकारली आहे.

या प्रकरणी अजय रामकुमार अगरवाल ( 40, धंदा-कन्स्ट्रक्‍शन व्यवसाय,रा. ब्रम्हासनसिटी जवळ, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा ब्रम्हाकॉर्प लिमीटेड, या नावाने बिल्डींग कंन्स्ट्रक्‍शनचा व्यवसाय आहे. त्यांच्या कंपनीने मौजे वडगाव शेरी येथे मिळकतीच्या ले आऊटमध्ये विकसन व बांधकामाचे काम सुरु आहे. सदर ले आऊटमध्ये वेगवेगळ्या फेजेस मध्ये विकसन करीत आहेत.

दोन्ही फेजेस करीता सन 2011 मध्ये ब्रम्हासन सीटी को ऑपरेटीव्ह हौसींग सोसायटी लिमीटेड, ही गृहरचना संस्था स्थापन केली आहे. संस्थेचा संपुर्ण कारभार सन 2011 पासुन सोसायटीचे निवडुन आलेले व्यवस्थापकीय मंडळ सांभाळत आहेत. सन 2012 पासुन सोसायटीचे संजीव ठोंबरे, कैलास ठोले व इतर 9 ते 10 सभासद यांनी फिर्यादीच्या कंपनी विरुध्द तक्रारी व आरोप करुन कंपनीस त्रास देणे सुरु केले. तसेच कंपनीने सोसायटीचे नावे अतिरीक्त जागेचे कन्व्हेयन्स डीड करुन दयावा या करीता डीडीआर यांचे कार्यालयात अर्ज दाखल केले होते. परंतु सदरचे अर्ज कायदेशिर रित्या कार्यालयाने फेटाळुन लावले होते.

त्यानंतर सन 2018 मध्ये सोसायटीच्या व्यवस्थापकीय मंडाळाबरोबर आणि सोसायटीच्या सर्व सभेबरोबर तडजोड होऊन दि.24/8/ 2018 रोजी कन्व्हेयन्स डिड नोंदवण्यात आले. असे असताना सोसयटीती सदस्य संजीव ठोंबरे, कैलास ठोले व इतर 9 ते 10 सभासद यांनी सदर कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी व संचालकांना वारंवार संपर्क करुन धमक्‍या देवुन फिर्यादीकडे मोठया रकमेची मागणी करत होते.

सोसायटीच्या सर्व सभासदांचा प्रतिनीधी म्हणुन सदस्य संजिव ठोंबरे व कैलास टोले हे वारंवार फिर्यादीकडे पैश्‍याची मागणी करत होते. विकसन प्रकल्पास स्टे आणु व तुमचे अर्थिक नुकसान करु अशी धमकी देवुन वारंवार ब्लॅकमेल करीत होते.

दरम्यान 27/7/21 रोजी संजिव ठोंबरे याने स्वतः साठी तसेच कैलास ठोले व इतर 9 ते 10 सभासद यांचे वतीने प्रतिनीधी म्हणुन येवुन 4 लाख रुपये घेतले. तसेच सदरची रक्कम ही त्यांच्या मागणीतील टोकन रक्कम असुन त्यांना आणखी 70 ते 80 लाख रुपये दयावे लागतील असा तगादा लावला. या तगादयाला वैतागून र्फिादीर अगरवाल यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत.