पुणे जिल्हा : बिबट्याने हल्ला केलेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील सुतारठिके वस्ती येथे मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला होता या तरुणाचा मंगळवार दि.५ रात्री उपचरादरम्यान मृत्यू झाला या तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली मंगेश रामदास गुंजाळ (वय २६ वर्ष रा. कांदळी, ता.जुन्नर) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती कांदळी येथील मंगेश गुंजाळ हा रविवार दि.३ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुतारठिके वस्तीवर असलेल्या डेअरी मध्ये दुध घालण्यासाठी मोटारसायकल वरून जात असताना रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे मोटारसायकलवर उडी मारली व मंगेश मोटारसायकल घेऊन खाली पडला

याचवेळी संतोष गुंजाळ व अक्षय महाले हे दोघेजण मंगेश याच्या पाठीमागून मोटारसायकलवर येत होते मंगेश याच्यावर बिबट्याचा हल्ला होत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने या ठिकाणाहुन पळ काढला या घटनेत मंगेश याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

त्याच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्याच्या मेंदूवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्यामुळे या तरुणाचा मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुत्यू झाला आहे.

मंगेश गुंजाळ हा युवक कांदळी येथील आनंदनगर मध्ये राहत होता. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती वडिलांचे वर्षापूर्वीच निधन झाले आहे. वीस वर्षांपूर्वीच आईचेही निधन झाले असून मंगेशला चार बहिणी असून तीन बहिणी विवाहित आहे.

शेतात कष्ट व मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालत होता परंतु मंगेश वर बिबट्याने हल्ला केला व यामध्ये त्याला आपले प्राण गमवावे लागल्याने कांदळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान मंगेश याचा मुत्यूला बिबटयाच कारणीभुत असुन बिबट्याने केलेल्या हल्ल्याने मंगेश हा दुचाकीवरून खाली पडुन गंभीर जखमी होऊन उपचार घेत असताना निधन झाले आहे त्याच्या परीवारास वन विभागाने भरपाई देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.