पुणे जिल्हा : इंडिया आघाडीत गेल्यानंतर मोदींचा आराखडा मांडू

प्रकाश आंबेडकर यांची टीका
शिक्रापूर –
लवकरच आम्ही इंडिया आघाडीत सहभागी होणार असून ज्यादिवशी इंडिया आघाडीत आम्ही सहभागी होऊ. त्यावेळी पंतप्रधानाने दहा वर्षात देशाला कस खोकला केले याचा आराखडा आम्ही मांडू, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.

कोरेगाव भीमा येथे २०६ व्या शौर्यदिनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.

इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून चर्चा सुरु असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामुळे कधी ना कधी औपचारिक अनौपचारिकरित्या भेट होणारच असल्याने अफवा पसरवण्यात काहीही अर्थ नाही.

इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी घ्यायचे हे आता त्यांनी ठरवायचं आहे. पण आता तरी आमच्यासाठी सध्या इंडिया आघाडीचे दार बंद असल्याचे देखील आंबेडकर यांनी सांगितले. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आलेले असून प्रशासनाला सुचवलेल्या बाबींची प्रशासनाने दखल घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले.