पुणे जिल्हा: संप फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आंदोलन

भोर : अंगणवाडी सेविकांनी जोरदार निदर्शने करण्यात आली.

भोर – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने त्यांच्या मागण्यासाठी सध्या दि. ४ डिसेंबरपासून संप चालू आहे. शांततेच्या मार्गाने हा संप चालू असताना दादागिरी करून हा संप फोडण्यासाठी काही सुपरवायझर यांनी प्रयत्न केले. त्याचे निषेधार्थ भोर तालुक्यातील मदतनीस नवीन रुजू झालेल्या अंगणवाडीसेविका यांनी तीव्र निदर्शन करून सुपरवायझरांचा तीव्र शब्दांत निषेध  केला.

सुपरवायझर यांनी जरूर त्यांचे काम करावे. परंतु आपल्या मागण्यासाठी संपावर असणाऱ्या नवीन जुन्या अंगणवाडी सेविकांना दमदाटी कऊन संप फोडण्यासाठी प्रयत्न करू नये, असे आम्ही त्यांना वारंवार विनंती करून सांगूनही स्वतः पोलिसांची धमकी देऊन नवीन व जुन्या अंगणवाडी सेविकाचा संप फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध नवीन व जुन्या अंगणवाडी सेविका यांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी सेविकांच्या न्याय व रास्त मागण्याबाबत विठ्ठल करंजे यांनी सरकारचा निषेध केला.

यावेळी महानंदा जेधे, सुनिता ढिले, वैशाली राऊत, सुलभा जोशी, कीर्ती शिर्के, सुजाता वीर, मीना शिवतरे, प्रमुख अंगणवाडी सेविका सामिल झाल्या होत्या. सुपरवायझर यांच्याविरुद्ध सोमवार (दि.८) जानेवारी २०२४ रोजी रीतसर नोटीस देऊन भोर पंचायत समिती समोर तीव्र धरणे आंदोलन व निदर्शने करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सचिव कॉम्रेड विठ्ठल करंजे यांनी दिली.