पुणे जिल्हा : इंदापूर तहसीलदारांवर भरदिवसा हल्ला : आजी-माजी आमदारांकडून घटनेचा निषेध

तालुक्यात कायद्याचा धाक राहिला नाही का ?
इंदापूर : इंदापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तहसीलदार श्रीकांत पाटील  त्यांच्या चालकावर आज सकाळी  हल्ला झाल्याची घटना घडलीय. ही घटना  तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संविधान चौकात झाली. अज्ञात हल्लेखोंरानी तहसीलदारांच्या शासकीय गाडीवर, लोखंडी रोडने हल्ला चढवला. श्रीकांत पाटील व त्यांचे चालक यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इंदापूर तालुक्यात कायदा राहिला असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.

यासंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार, तहसीलदार श्रीकांत पाटील आपल्या शासकीय कामकाजासाठी कार्यालयाकडे शासकीय वाहनातून जात होते. त्यावेळी हा हल्ला  झाला आहे. हल्लेखोरांनी मिरचीची पूड व लोखंडी रॉड या हल्ल्यात वापरलेले आहेत. विना नंबरच्या चार चाकीतून हेे हल्लेखोर या ठिकाणी हल्ला करण्यासाठी आले होते असे समजते.

तहसीलदारांचे वाहनचालक मल्हारी मखरे यांच्या डोळ्याच्या दिशेने मिरचीची पूड हल्लेखोरानी टाकली.  एवढेच नाही तर लोखंडी रॉडचा जबर मार देखील या चालकास लागला आहे. MH 42 AX 1661 या शासकीय गाडीचे जबरी नुकसान झाले आहे. इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालयात पाटील व त्यांच्याा चालकाने तातडीने उपचार घेतले.

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे तसेच भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. घडलेल्या घटनेचा निषेध करत तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

तर ऍड. राहुल मखरे यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला आहे. सर्व काचा फोडून तहसीलदार व त्यांचे चालक यांच्या डोळ्याच्या दिशेने चटणी टाकली व जीवे मारण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला आहे. या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यांनी केली आहे.