पुणे जिल्हा : आमदार आव्हाडांच्या प्रतिकृती पुतळ्याचे दहन

नारायणगाव – प्रभू रामाबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या आमदार जितेंद्र आव्हाड यांचा नारायणगाव बस स्थानकाजवळ भाजपा व हिंदू संघटनांच्या वतीने निषेध करुन त्यांच्या प्रतिकृती पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी राजेंद्र कोल्हे, अशीष माळवदकर, अक्षय खैरे, नामदेव खैरे, उमेश अवचट, अक्षय डोके, नयन खैरे, अमित औटी, अक्षय कसाबे, मोहक वाजगे, प्रशांत पाटिल, अक्षय शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थितांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत भविष्यकाळामध्ये अशाप्रकारे चुकीचे वक्तव्य केली तर जीभ हसडून काढू अशा प्रकारचा इशारा दिला. यावेळी आशिष माळवदकर, नामदेव खैरे यांनी जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राला लागलेली कीड असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांना वेळीच लगाम घालण्याचे आवाहन केले.

अन्यथा हिंदूंना धडा शिकवावा लागेल असा इशारा देण्यात आला. निषेध मोर्चात जय श्रीराम, वंदे मातरम, प्रभू रामचंद्र की जय अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. नारायणगाव बस स्थानकावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी बंदोबस्त ठेवला होता.