पुणे जिल्हा : वाल्ह्यात संविधान दिन उत्साहात साजरा

वीर जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने 74 वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाल्हे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे व सरपंच अतुल गायकवाड यांच्या हस्ते 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या प्राणांची बाजी दिलेल्या वीर जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच भारतीय संविधान पुस्तकांचे पुजन करून संविधानाच्या उद्दिशेकेचे वाचन करत उपस्थित मान्यवरांनी शपथ घेतली. यावेळी शहीद जवानांच्या प्रतिमे समोर सुरेख रांगोळी रेखाटून, उपस्थितांनी मेणबत्ती पेटवून त्यांना अभिवादन केले. यावेळी, भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, माजी सभापती गिरीश पवार, माजी सरपंच महादेव चव्हाण, अशोक बरकडे, उपसरपंच अमित पवार, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, प्रा.संतोष नवले,

माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, अनिल भुजबळ, चंद्रकांत सासवडे, तेजस दुर्गाडे, दत्तात्रेय दुर्गाडे, सागर दुर्गाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. उपसरपंच अमित पवार यांनी आभार मानले. दरम्यान, आडाचीवाडी, पिसुर्टी, सुकलवाडी, वागदरवाडी, दौंडज, राख आदी ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.