पुणे जिल्हा : पिके, फळांच्या नवीन जातीची लागवड करा

विजय कोलते : सीताफळ, अंजीर बागेत शिवार फेरी
जेजुरी –
कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या पिके व फळांच्या नवीन जातीची शेतात लागवड करावी. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पन्न घ्यावे. यासाठी शिकलेल्या तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले.

पुरंदर तालुका अंजीर व सीताफळ बागायतदार संघाच्या वतीने जेजुरी जवळील कोळविहिरे येथे पुरंदर सीताफळ संघाचे सचिव मंगेश लवांडे यांच्या सीताफळ व अंजीर बागेत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

पुरंदर तालुक्यातील दिवे (जाधवाडी) येथील अंजीर-सीताफळ केंद्राचे संशोधन प्रमुख डॉ. प्रदीप दळवे म्हणाले की, सेंद्रीय खतांचा वापर करून विषमुक्त शेती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेणखत, गांडूळखत यासारख्या खतांचा वापर करावा.

कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती कृषी सेवक स्नेहल जाधव व कृषी सहायक माने यांनी दिली. शेतकर्‍यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसरन संशोधन केंद्राचे वतीने डॉ. युवराज वालगुडे यांनी केले.

शिवार फेरीला राज्य अंजीर बागायतदार संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, निलेश मेमाणे, बाळासो दाभाडे, रणसिंग पवार, राजेंद्र गायकवाड, दादा घोरपडे, दशरथ लवांडे यांनी उपस्थित राहून विविध मुद्दे मांडले. पुरंदर अंजीर-सीताफळ संघाचे उपाध्यक्ष संतोष मस्के यांनी आभार मानले.