पुणे जिल्हा : इंदापूरच्या पश्‍चिम टप्प्यात दिगंबराचा जयघोष

वालचंदनगर – दिगंबरा.. दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा… जय घोषात इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वालचंदनगर व निमसाखर सह अन्य गावांमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.

मंगळवारी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी दत्त जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान गावोगावी असलेल्या भजनी मंडळांकडून टाळ मृदुंग च्या गुजरामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा दुपारी पुष्प वृष्टी करत हा सोहळा मोठ्या थाटात, महा प्रसादाचे आयोजन करत दत्तजयंती उत्साहात साजरी झाली.

यामध्ये वालचंदनगर येथील जमदाडे यांच्या व्हिनस वर्कशॉप, बाजार पेठेबरोबरच या भागातील सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे यांच्या निवासस्थानी, नलवडे वस्ती येथील भारत व श्रीरंग नलवडे यांच्या निवासास्थांलगत दत्त जयंतीमध्ये उत्सव साजरा करण्यात आला.

निमसाखर परिसरात गावकय्रांच्या वतीने दत्त मंदिरबरोबरच लोहार गल्लीमध्ये विजय खरात यांच्या प्रयत्नातुन बांधलेल्या दत्त  मंदिराबरोबरच बोंद्रे वस्ती, कारंडे वस्ती भागात देखील मोठ्या उत्साहात दत्तजयंती साजरी करण्यात आली.