पुणे जिल्हा : पुरंदरमध्ये गावोगावी 200 टन चारा वाटप

स्व. चंदूकाका जगताप मित्र परिवाराचा उपक्रम
सासवड –
पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील गावोगावच्या शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी स्व. चंदूकाका जगताप मित्र परिवाराच्या माध्यमातून मोफत चारा वाटपाचा उपक्रम गेली महिनाभरापासून हाती घेण्यात आला असून आत्तापर्यंत 200 टनांपेक्षा अधिक चारा वाटप करण्यात आला आहे.

एखतपूर-मुंजवडी, खानवडी येथे शुक्रवारी (दि. 3) चारा वाटप करण्यात आला. पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. चंदुकाका जगताप मित्र परिवाराच्या चारा वाटप करण्यात येत आहे. साकुर्डे, शिवरी, पिंपरी पवारवाडी, हिवरे, नारायणपूर, पोखर, चिव्हेवाडी, देवडी, खळद, सुपे, ताथेवाडी, भिवडी, पिंपळे, कुंभारवळण, पोमणनगर, कुंभारवळण आदी गावांतील वाड्यावस्त्यांवर 215 टन चारा वाटप करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे चारा वाटप करण्यात येत असल्याचे नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदकुमार जगताप यांनी सांगितले. दरम्यान, एखतपूर – मुंजवडी, खानवडी येथे मोफत चारा वाटपाप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, संभाजीराव गरूड, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतन महाजन, रविंद्रपंत जगताप, रमेश बोरावके, रामभाऊ नेवसे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.