पुणे जिल्हा : भोर उपजिल्हा रुग्णालयातीस फळे वाटप

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
भोर –
राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा पद्मविभूषण शरद पवार यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली, तसेच भोर शहरातील ‘आधारवड’ या वद्धाश्रमातही फळे व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, शहराध्यक्ष यशवंत डाळ, कार्याध्यक्ष संदीप नांगरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना धुमाळ,

युवक अध्यक्ष गणेश खुटवड, ज्येष्ठ नागरिक सेलचे तालुकाध्यक्ष भिकोबा कुमकर, पदवीधर सेलचे अध्यक्ष पार्थ रावळ, तालुका उपाध्यक्ष सर्जेराव पडवळ, विधी सेलचे प्रदेश सरचिटणीस गणेश डिंबळे, युवक उपाध्यक्ष गणेश गोसावी,

माजी सरपंच रोहिदास जेधे, माजी सरपंच धोंडिबा खुटवड, सारंग शेटे, अजित बांदल, गणेश गावडे, गणेश खुटवड, विकास कुमकर, तसेच भोर तालुका व शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.