पुणे जिल्हा : बारामतीत राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण

किरण गुजर यांच्या फेसबुक पोस्टने चर्चेला उधान
बारामती :
नटराज एक संस्थान आहे, अशी बेताल वक्तव्ये व फालतू शेरेबाजी करून बारामती मध्ये या पूर्वी कधीही, न कोणीही न केलेली गटबाजी, व्यक्ती द्वेषाचे राजकारण कैले जात आहे हे थांबणार नसेल तर मलाही माझा स्वाभिमान सोडता येणार नाही हा माझ्या अंतरात्माचा आवाज आहे. अशा प्रकारची फेसबुक पोस्ट करून बारामती च्या स्थानिक राजकारणातील महत्वाचा नेता म्हणून ओळख असलेले जेष्ठ नेते किरण गुजर यांची खळबळ उडवून दिले आहे.

नगरसेवक, विद्याप्रतिष्ठान चें ट्रस्टी अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. याशिवाय पवार कुटुंबातील अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून किरण गुजर यांना ओळखले जाते. गेल्या वर्ष भरापासून किरण गुजर हें सक्रिय राजकारणापासून काहीस अंतर ठेवून असल्याचे बोलले जात होते आज अखेर किरण गुजर यांनी फेसबुक वर आम्हाला पण स्वाभिमान सोडता येणार नाही अशी पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी चें दोन गट पडलेले असताना किरण गुजर यांच्यासारखा महत्वाचा नेता अशी पोस्ट करतो तेव्हा बरामतीत चर्चेचा विषय होणार यात शंका नाही.

आज चार फेब्रुवारी रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हें बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांची दादांच्या दौऱ्यात धांदल असते. अशा वेळीस किरण गुजर यांनी खळबळ उडवून देणारी पोस्ट फेसबुक वर शेअर केली आहे. किरण गुजर यांनी नटराज नाट्य मंडळ हें खासगी संस्थांन आहे. अशी खुलेआम वक्तव्य केले जात आहे असं बोलले आहे. यापूर्वी अशी गटबाजी कधी ही झाली नाही. शेवटी आम्हाला स्वाभिमान आहे नीं तो राखवा लागेल अशा आशयची पोस्ट केली आहे. त्यामुळे बरामतीतं चर्चेला उधाण आले आहे.

किरण गुजर हें पवार कुटुंबाचे अत्यंत निकटवर्तीयं मानले जातात. निवडणुकाचें अचूक नियोजन करण्यात त्यांच्या हातखंडा आहे. किरण गुजर सारख्या नेत्याची दोन्ही गटाला गरज आहे. मात्र किरण गुजर यांचे स्थानिक नेत्यांशी चांगलेच मतभेद झाल्याची चर्चा होती. मधल्या काळात कुटूंबातील सदस्यांच्या आजारपणाच्या निमित्ताने राजकीय भूमिकेपासून अलिप्त होते मात्र आजच्या त्यांच्या पोस्ट ने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

महत्वाच म्हणजे आज उपमुख्यमत्रा आजतदादा पवार ह बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. असं असताना किरण गुजर यांनी केलेली हो फेसबूक पोस्ट म्हणजे चर्चेचा मोठा विषय आहे. किरण गुजर यांना नेमका कोणाला इशारा द्यायचा आहे हें सर्वसामान्य नागरिकांना कोडं सुटत नाही. मात्र ते सध्या दुखावलेले आहेत हें मात्र निश्चित झाले आहे.

त्या फेसबुक पोस्ट संदर्भात किरण गुजर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले गेली ४० वर्षांपासून पवार कुटुंबीय अजितदादा पवार यांच्यासोबत काम करत आहे. बारामतीत सध्या गटबाजीचे राजकारण सुरू आहे. त्याचा नाहक त्रास होत आहे. बारामतीच्या विकासावर देखील याचा परिणाम होत आहे.अशा प्रकारचे राजकारण यापूर्वी नव्हते. अजितदादा यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.