पुणे जिल्हा: केसनंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन हरगुडे यांची निवड

वाघोली – केसनंद तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सचिन माणिक हरगुडे उपसरपंच पदी अक्षदा सचिन हरगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केसनंद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या काळात नितीन हरगुडे, उपसरपंच रूपाली हरगुडे यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेत विकास कामांचा डोंगर रचला. या दोघांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली.

केसनंद ग्रामपंचायतीवर मिलिंद हरगुडे यांच्या गटाचे वर्चस्व असल्याने निवडणूक बिनविरोध होणार हे चित्र स्पष्ट झाले होते त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्हा भाजपचे नेते प्रदीप दादा कंद, रोहिदास उंद्रे, महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे सचिव गणेश कुटे, भाजप युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव, प्रदीप सातव, शरद आव्हाळे, यांच्या हस्ते निवडीबद्दल सचिन हरगुडे, अक्षदा हरगुडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच मिलिंद हरगुडे, माजी सरपंच तानाजी हरगुडे, माजी सरपंच नितीन गावडे, उद्योजक रमेश हरगुडे, प्रमोद हरगुडे, बाबासाहेब हरगुडे, दिनेश झांबरे, दत्ताभाऊ हरगुडे, सुभाष बांगर, बाळासाहेब सातव पाटील, वाल्मीक हरगुडे, तानाजी बांगर, सुभाष बांगर,एस पी हरगुडे, गणेश हरगुडे, राजेंद्र सावंत, शिवाजी हरगुडे, विकास हरगुडे, माऊली हरगुडे, शंकर वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

केसनंद ग्रामपंचायतीचे पॅनल प्रमुख मिलिंद हरगुडे व ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाने व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या साथीने पुणे शहराजवळच्या गावाचा विकास करून मूलभूत समस्या सोडवण्यासाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सचिन हरगुडे यांनी सांगितले.