पुणे जिल्हा : पावसाच्या आगमनाने शेतकरी राजा सुखावला

वीसगाव खोरे – गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीसगाव खोऱ्यातील भात पिकाची तरव्याची रोपे तरारून आली आहेत. वेळेवर व रोज पाऊस पडत असल्याने शेतकरीराजा सुखावला आहे.

गेले तीन दिवस पाऊस पडत असल्याने शेतकरी जमिनीला वाफसा येण्याची वाट पाहत आहे. यंदा अवकाळी पाऊस मे महिन्यात झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करायला वेळ मिळाला. मशागतपूर्व शेतीची कामे नांगरणी, वखरणी योग्य वेळेत झाल्याने या भागातील सोयाबीन, भुईमूग,घेवडा,तीळ, कडधान्ये, भात तरवे यांच्या पेरण्या करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.

शेतकरी पावसाअभावी भात तरवे पेरणी केली नव्हती.परंतु शेतकरी तरवे पेरणीसाठी लगबगीला आला आहे. शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधन आहे. त्यांच्या भात पिकाच्या तरव्याची रोपे पावसाने तरारली आहे. भोर तालुक्यात ग्रामीण भागात सर्वत्र खरिपाचा हंगाम सुरू झाला आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.

भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात गेले तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे खरीप हंगामाची तयारी करण्यात शेतकरी गुंतला आहे. प्रामुख्याने भात खाचरांमध्ये पाणी साठत असल्याने पेरणी योग्य जमीन करताना शेतकऱ्यांना अडचणीत आहे.

शेतात पावसाचे पाणी पाण्यामुळे जमिनीची नांगरणी, कुळवणी, फणपाळी करणे अवघड जात आहे गेले महिन्यात चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी शेताच्या कामांची तयारी करून लागवड योग्य क्षेत्र बनवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मुसळधार पावसामुळे सर्व कामे खोळंबली आहेत. योग्य घात आल्यावर भात पेरणीला आणि भाताचे रोपांचे तरवे टाकण्याचे काम सुरू होईल.