पुणे जिल्हा :दमदार पावसाने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित

पळसदेव – पळसदेव तालुका इंदापूर भागात सलग चार-पाच दिवस पावसाने हजेरी लावण्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कडक उन्हाळ्यामुळे पाण्यासाठी बळीराजा जीवाचं रान करत होता. लाखो रूपये खर्च करून शेतकरी शेतापर्यंत पाणी पोहचवण्याचा प्रयत्न करत होता.

पाण्याअभावी पिके जाळून जाण्याच्या मार्गावर होती. अनेकांनी पिके आता जगातील अशी असाच सोडून दिली होती. उजनी धरणातील पाणी पातळी एकदमच कमी झाल्याने उजनीतून पाणी उचलून पिकांना देणे मोठं जिकीरीचं झालं होत. मात्र, ऐन संकटात पावसाने हजेरी लावण्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

पळसदेव तालुका इंदापूर भागात गेल्या पाच दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला असल्याने बळीराजा एकदम सुखावला आहे. गेल्या पाच दिवसांतून दमदार पाऊस झाल्याने सगळी शेत पाण्याने फुल्ल होऊन गेली आहेत. गेली दोन दिवस पळसदेव भागात संतधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वाढ होण्यास मदत होत आहे.

गेली अनेक दिवस शेतकरी व नागरिकांना पाण्यासाठी दही दिशा फिरण्याची वेळ आली होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. अगदी उजनी काठावरील अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती . या पावसाने नागरिक व बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.