पुणे जिल्हा: जलसंधारण विभागामार्फत 15 कोटींचा निधी मंजूर; आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर –नवीन वर्षाच्या सुरवातीलाच आमदार दत्तात्रय भरणे यांनी तालुकावासियांना मोठे गिफ्ट दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये साठवण तलाव तसेच साठवण बंधारे बांधण्याकरिता सुमारे 15 कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती भरणे यांनी दिली.

भरणे हे 2014 साली आमदार झाल्यापासून ते आजतागायत सातत्याने इंदापूर तालुक्याच्या विकासात भर घालण्यासाठी दर आठ-पंधरा दिवसाला काहीना काही निधी मंजूर करून आणत असून निधीचा हाच वेग कायम ठेवण्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी चांगल्याप्रकारे यश मिळवले आहे. यंदा नववर्षाच्या सुरवातीलाच त्यांनी जलसंधारण विभागाचा तब्बल 15 कोटी रूपये निधी मिळवून विकासकामांचाओघ चालू ठेवला आहे.

आमदार भरणे म्हणाले, विकासकामांना निधी मंजूर करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असून यासाठी आपला शेवटपर्यंत यशस्वीपणे पाठपुरावा होत असल्याने निधी मंजूर करण्यामध्ये अडचण निर्माण होत नाही. आजची पंधरा कोटीच्या कामांची मंजुरी ही फक्त सुरवात असून लवकरच आपल्याला यापेक्षाही जास्त निधी मिळणार आहे. हा निधी मिळण्याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे भरणे यांनी सांगितले.

मंजूर कामे साठवण बंधारे (रक्कम लाखांत)

भादलवाडी (बाळासो कन्हेरकर वस्ती) 50.33, बिजवडी (महादेव नरळे वस्ती) 49.88, गोखळी (मंजुळकर शेत) 48.53, कळस (कांबळे शेत, गट नं.770) 58.56, कळस (सांगळे शेत, बागवाडी) 37.63, खोरोची (सूर्यकांत साखरे शेत) 39.45, निरगुडे (मासाळ शेत) 57.19, पोंदकुलवाडी (मारूती कोकणे शेत) 36.61, रेडणी (आप्पासो मारकड, दिलीप मारकड शेत) 33.32, रेडणी (बीकेबीएन ब्रीज) 35.78, शेळगाव (तुपे विहीर) 34.47, शेळगाव (ननवरे विहीर) 40.12, शेटफळ गढे (शिंदे-फडतरे शेत) 35.38, कळस (खारतोडे -शेख शेत) 47.93, कळस (फरकट-गावडे शेत) 45.94, पोंधवडी (गायकवाड-गुरव फार्म) 47.67.

व्याहळी (पवार गुरजी-गथाटे फार्म) 39.35, कळस (नाळे-भांडवलकर फार्म) 52.46, पिंपळे (लकडे फार्म) 48.36, पोंधवडी (पिंपळे ब्रीजजवळ)-47.99, बिजवडी (नरळे-काळेल शेत) 39.72, बोरी (सुभाष पाठक-इंगळे शेत) 48.49, गागरगाव (आप्पासाहेब पोंदकुले शेत) 39.47, गोखळी(सोपान बारवकर शेत) 31.38, निरगुडे देवस्थान (मचाले शेत) 38.75, सरडेवाडी (गट नं 65/2) 36.28, सरडेवाडी (खटकाळे शेत) 34.31, वडापुरी (काटकरवस्ती) 47.44, रूई (लावंड-कांबळे शेत) 43.63, अंथुर्णे -49.46, अंथुर्णे (घोलपवस्ती) 48.36.