पुणे जिल्हा : रोजा करणाऱ्या बालकांचा सन्मान

तळेगाव ढमढेरे : पवित्र रमजान महिन्यात तळेगाव ढमढेरे येथील बालचिमुकल्यांनी रोजाचा उपवास धरला आहे. या बालकांचा शिरूर तालुका आरपीआय पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

लाखनी येथील लहान मुलांमध्ये यंदा रमजान महिन्याचे विशेष आकर्षण दिसून येत आहे. फझल इरफान अत्तार, अलीअमजा तौसिफ़ शेख, अहान समीर मिर्झा या लहान मुलांनी रोजा केला आहे.

सूर्यास्ताच्यावेळी त्यांनी खजूर खाऊन नमाज अदा करून उपवास सोडला. लहान मुलांचे शिरूर तालुका आर पी आय पक्षाच्या वतीने संपूर्ण पोशाख व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, तळेगाव ढमढेरे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार किशोर तेलंग, फझल इरफान अत्तार, अलीअमजा तौसिफ़ शेख, अहान समीर मिर्झा, मझर मोसीन चौधरी, तौसिफ़ शेख, इरफान अत्तार, मुनीर मोमीन, मन्नान शेख, दादामिया मोमीन, राजू मोमीन, कैफ शेख, मुजमिल बागवान, अहमद शेख उपस्थित होते.