पुणे जिल्हा : श्रीकृष्ण पतसंस्थेतर्फे ठेवीदारांचा गौरव

मंचर : कृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने नारोडी ता.आंबेगाव येथील शाखेत राम मंदिराची प्रतिकृती देऊन श्रीराम ठेव योजनेत सहभागी झालेल्या सभासदांना गौरविण्यात आले .

यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे, व्यवस्थापक विठ्ठल वायकर, संचालक दत्ता हुले, राजेंद्र खिरड, शाखा अधिकारी वैशाली पिंगळे, प्रा. शरद घोडेकर, अनिल मोढवे आदी मान्यवर व ठेव योजनेतील सभासद उपस्थित होते.

श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सर्वसामान्याची आहे. सभासदांनी विश्वास ठेवून श्रीराम ठेव योजनेत सहभाग घेतला आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त सभासदांना कर्ज देऊ शकतो, असे पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे यांनी सांगितले.