पुणे जिल्हा : माळवाडीत जल दिनाचा सामाजिक जागर

विविध उपक्रमातून प्रबोधन
टाकळी हाजी –
माळवाडी (ता. शिरूर) येथे आयटीसी मिशन सुनहरा कल, अफार्म संस्था तसेच जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन व कुंडमाऊली पाणी वापर संस्था यांच्या वतीने जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक जागर करीत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले.

यावेळी कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे, घोडगंगाचे संचालक सोपान भाकरे, सरपंच सोमनाथ भाकरे, शाखाधिकारी टाकळी हाजी तानाजी चिखले, श्री कृष्ण पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सुभाष झिजांड, उपसरपंच आदिनाथ भाकरे, अफार्मचे समूह संघटक अमितकुमार मेहत्रे, कृषी प्रवेक्षक संजय शिंदे, अनिकेत भाकरे, कृषी प्रवेक्षक प्रवीण कापरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयटीसी मिशन सुनहरा कल व अफार्म संस्थेचे अमितकुमार मेहत्रे यांनी आयटीसी मिशन सुनहरा कल व अफार्म संस्था यांच्या वतीने ‘घोडनदी उपखोरे जलसंसाधन व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. अफार्मचे कृषी विस्तार अधिकारी संजय शिंदे यांनी शाश्वत ऊस तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन केले.

आयटीसी मिशन सुनहरा कल व अफार्म संस्था यांच्या वतीने जागतिक जल दिनाचे औचित्य साधून कुंडमाऊली पाणी वापर संस्था,गुरुनाथ पाणी वापर संस्था,चौफुला पाणी वापर संस्था, मळगंगा पाणी वापर संस्था, संघमेश्वर पाणी वापर संस्था, श्री कृष्ण पाणी वापर संस्थेला सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रकाश वायसे, सुभाष झिजांड, सोपानराव भाकरे, शाखाधिकारी तानाजी चिखले यांनी मार्गदर्शन केले. माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंडमाऊली पाणी वापर संस्थांनी परिश्रम घेतले.