पुणे जिल्हा : जितेंद्र गवळी याची राज्‍यस्‍तरीय किक बॉक्सिंगची निवड

पिंपरी – आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थी जितेश गवळी याची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. राज्य क्रिडा विभागांतर्गत सोलापूर येथील कुमठा नाका जिल्हा क्रीडा संकुलात विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात १७ वर्षांखालील वयोगटातील सलग दोन सामन्यांत विजय मिळवत सुवर्णपदक मिळवले. विजेते खेळाडू जितेश गवळी याची नांदेड येथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, ए. एम. जाधव, प्राचार्य भानुदास मालुसरे, उपप्राचार्य के. डी. गायकर, पर्यवेक्षिका सिंधू मोरे, अशोक आवारी, शिवराज वायचाळ यांनी अभिनंदन केले.