पुणे जिल्हा : राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने काळेंचा गौरव

तळेगाव ढमढेरे  – राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे यांना नुकतेच गौरविण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ तसेच काव्य संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासा (जि. नगर) येथे शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना त्या ठिकाणी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. यामध्ये काळे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या प्रमुख सुनीता घाडगे पाटील, संगीता गुंजाळ, शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण संजय वाघमारे, संस्थेचे सचिव ताई वाघमारे, संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब शिरसाठ, राज्य समन्वयक धीरज कांबळे, महाराष्ट्र मार्गदर्शक सुधीर चव्हाण, दिपाली सरोवसे, मेजर तुकाराम डफळ, प्रगतशील शेतकरी नामदेव काळे, संतोष काळे, कृष्णा कांबळे उपस्थित होते.

जनतेच्या सेवेचा मी भुकेला असून मला राजकारणापेक्षा समाजकारण जास्त महत्त्वाचे वाटते.
– बापूसाहेब काळे, सरपंच, निमगाव म्हाळुंगी